वधू वर मराठा वर आपले स्वागत आहे, मराठा समाजासाठी अग्रगण्य वैवाहिक सेवा प्रदाता. तुम्हाला सदस्य बनायचे असेल आणि इतर सदस्यांशी संवाद साधायचा असेल आणि वधू वर मराठा चा वापर करायचा असेल, तर खालील वापराच्या अटी व शर्ती वाचा आणि नोंदणी प्रक्रियेतील सूचनांचे पालन करा.
- केंद्रात फक्त मराठा समाजातील स्थळांची नोंदणी होते.
- ही वेबसाइट वापरणाऱ्या वापरकर्त्याने सदस्यत्व पात्रता निकषांचे पालन करणे आवश्यक आहे जर वापरकर्ता महिला असेल तर 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा आणि सदस्य पुरुष असल्यास त्याचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावा.
- सदस्य आणि आमच्या मॅरेज ब्युरोमधील सर्व संवाद सदस्यत्वादरम्यान नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि नोंदणीकृत ईमेल आयडीद्वारेच केला जाईल.
- प्रत्येक सभासदाने आपल्या स्थळांची खरी - खरी माहिती नोंदणी फार्म मध्ये लिहावी. ही प्रत्येक सभासदाची नैतिक व वयक्तिक जवाबदारी आहे.
- एकदा भरलेली फी कुठल्याही सबबीवर परत मिळणार नाही.
- केंद्रातून एका सभासदाला एका वेळी त्याचे स्थळास अनुरूप असलेल्या जास्तीत जास्त ५ स्थळांची माहिती मिळेल. एकदा माहिती दिल्यावर ५ दिवसापर्यंत नवीन स्थळांची कुठलीही माहिती दिली जाणार नाही.
- सदस्य समान लिंगाचे संपर्क तपशील घेऊ शकत नाहीत. उदा. पुरुष सदस्य इतर पुरुष सदस्यांचे संपर्क तपशील घेऊ शकत नाहीत.
- आम्ही सदस्यांच्या नोंदणी प्रक्रियेदरम्यान त्यांच्या कार्यरत संपर्क क्रमांकाची पृष्टी करतो परंतु, नंतर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकत नसाल, तर आम्ही यासाठी जबाबदार राहणार नाही.
- जुळणाऱ्या प्रोफाइलचे संपर्क तपशील फोन कॉल किंवा व्हॉट्सॲप किंवा इतर कोणत्याही प्रकारे प्रदान केले जाणार नाहीत. विनंती फॉर्म सबमिट केल्यानंतर हे केवळ नोंदणीकृत ईमेल आयडीवरील ईमेलद्वारे प्रदान केले जाऊ शकते.
- विवाह योग केंद्रातर्फे किंवा स्वप्रयत्नाने जुळून आल्यास त्या संबंधिची माहिती केंद्र संयोजकास विनाविलंब कळवावी. केंद्रातर्फे विवाह योग जमल्यास कुठलीही देणगी द्यावी लागत नाही.
- वृत्तपत्रांमध्ये केंद्राकडून देण्यात येणाऱ्या जाहिरातींमध्ये केंद्रात नोंदवलेल्या सर्व स्थळांची माहिती देण्यात येत नाही याची कृपया नोंद घ्यावी.
- आपण घेतलेल्या स्थळांच्या माहितीची खातरजमा स्वतः तसेच आपले नातलग, मित्रमंडळीमार्फ़त करावी. भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास संयोजक जबाबदार राहणार नही. वधु-वर सूचक फक्त स्थळ सुचवितो, स्थळाची वागणूक, नीतिमत्ता, चारित्र्य , इ. व बायोडाटात लिहिलेली सर्व माहितीची खातरजमा स्वतः स्थळ निश्चित करण्याआधी करून घ्यावी. ती जवाबदारी सभासदांची आहे.
- केंद्राकडून नेलेल्या माहितीची कोणताही गैरवापर करता कामा नये. तसे आढळल्यास सबंधीत सभासदाचे सभासदत्व रद्द केले जाईल.
- नाव नोंदणी नंतर विवाह जमेलच किंवा अमुक दिवसात विवाह जमेल याची खात्री किंवा हमी केंद्र देऊ शकत नाही.
- पालकांनी मुला/मुलींचा बायोडाटा पाहून त्यांची शैक्षणिक पात्रता, आर्थिक कुवत, शारीरिक अनुरूपता व अपेक्षा लक्षात घेऊन त्या प्रमाणे स्थळे घ्यावीत.
- या विवाह ब्युरोचे सदस्य बनून आणि/किंवा या साइटच्या सेवांचा वापर करून, तुम्ही बिनशर्त आणि अपरिवर्तनीयपणे पृष्टी करता की तुम्ही वरील तरतुदी वाचल्या आणि समजून घेतल्या आहेत आणि त्यांचे पालन करण्यास सहमत आहात.